विंचूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी संदीप शिरसाट उपाध्यक्ष पदी जगन्नाथ जोशी
विंचूर दि.२६(प्रतिनिधी) विंचूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी दै.गांवकरीचे विंचूर प्रतिनिधी संदीप शिरसाट यांची तर उपाध्यक्षपदी दै. पुण्यनगरीचे प्रतिनिधी जगन्नाथ जोशी यांची निवड करण्यात आली.
मावळते अध्यक्ष नितिन गायकवाड यांचा कार्यकाल संपल्याने नविन अध्यक्ष निवडीसाठी येथील एरिगेशन काँलनीत विंचूर प्रेस क्लबची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी अध्यक्ष पदासाठी संदीप शिरसाट यांची सर्वानुमते निवड झाली.तर जगन्नाथ जोशी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.संदिप शिरसाट यांच्या नावाची भाऊसाहेब हुजबंद यांनी सुचना माडली तर जगन्नाथ जोशी यांनी अनुमोदन दिले.जगन्नाथ जोशी यांच्या नावाची प्रकाश जाजु यांनी सुचना मांडली.
याप्रसंगी विंचूर प्रेस क्लबचे सदस्य डि.बी.काद्री किशोर पाटिल, प्रकाश जाजु,जगन्नाथ जोशी, भाऊसाहेब हुजबंद,संदीप शिरसाट,नितीन गायकवाड, दिपक घायाळ आदी उपस्थित होते
.



