विंचुरला वादळी पावसाने कांदा शेडचे लाखोचे नुकसान ; शेड खाली तीन मेंड्यांचा मृत्यू
BHAUSAHEB HUJBAND 8999921994
विंचुर,ता.३० विंचूर व परिसरात रविवारी दोन वाजेच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसाने विंचूर उपबाजार समितीच्या व्यापार्यांचे नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत असलेले कांद्यांचे दहा शेड जमिनदोस्त होवुन कांदा भिजल्याने व्यापार्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले.
त्याच बरोबर शेतकर्यांचा साठवणूक करुन उरलेला कांदा भिजल्याने शेतकर्यांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.कोरोनाचे सावट असल्याने बाजार समिती गेली दहा ते बारा दिवस बंद होती.आता बाजार समिती सुरु झाली परंतु शेतकर्यांना शेतमाल विक्रीसाठी जायचे असेल तर कोरोना चाचणी करून जावे अशी नियामवली बाजार समितीने केल्याने बरेच शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजार समितीत जात नसून थांबलेले आहे.त्यामुळे कांदा साठवणूक करून उरलेला कांदा पडून आहे.आज दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे कांदा झाकण्यासाठी शेतकर्यांची एकच धावपळ उडाली.आधीच लॉकडाउन असल्याने दुकाने बंद आहे.त्यामुळे कांदा झाकण्यासाठी ताडपत्री मिळत नसल्याने शेतकर्यांचे मोठे हाल होत आहे.
सलग दोन दिवसापासून होत असलेल्या वादळी पावसाने शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येणार असला तरी येथील कांदा व्यापार्यांचे कांदा शेडचे नुकसान झाल्याने व्यापारी वर्गावर अर्थिक संकट ओढावलेले आहे.
वादळी पावसाने नुकसान झालेले व्यापारी पुढील प्रमाणे गजानन ट्रेडिंग चे दोन शेड,राजेश्री ट्रेडिंग , कदम अँड सन्स , आयजा ट्रेडिंग, कृष्णा ट्रेडिंग, आर.टी ट्रेडिंग,मेडोना एक्सपोर्ट ,हरिओम टेडर्स शेडचे नुकसान झाले.
तीन मेंड्यांचा मृत्यू
पाऊस आल्याने राजेश्री ट्रेडिंग या कांद्याच्या शेड खाली मेंड्या आश्रयाला थांबलेल्या होत्या.त्यावेळी वादळाने शेड पडल्याने शेड खाली दाबून तीन मेंड्यांचा मृत्यू झाला.


