Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

टेम्पो विहिरीत कोसळून 14 भाविकांचा मृत्यू

 सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे भाविकांना घेऊन जात असलेली 

पिकअप गाडी विहीरीत कोसळली. या भीषण अपघातात पिकअप गाडीतील 14 जणांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 

 काही दिवसांपूर्वी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात अशीच एक घटना घडली आहे. नाशिकची घटना ही रात्री घडली होती. पण माळशिरसची घटना ही भर दिवसा घडली आहे. या घटनेत 14 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आठ जणांचे मृतदेह विहरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. सर्व 14 जण सोलापूरच्या रांजणीगावचे रहिवासी आहेत. ते देवदर्शनाला गेले होते, अशी माहिती समोर येत आहे.

संबंधित अपघाताची घटना ही माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ घडली आहे. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शेतात विहीर आहे. ही विहीर रस्त्याच्या शेजारीच आहे. या विहिरीला फार मोठे कठडे नाहीत. तसेच ती काठोकाठ पाण्याने भरली आहे. याच विहिरीत भाविकांची पिकअप गाडी कोसळली आहे. हा अपघात नेमका कसा घडला? ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण भर दिवसा ही अपघाताची घटना घडली आहे. घटनेत तब्बल 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

म्हसवडमधील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी रांजणीगावचे 14 जण पिकअपने गेले होते. दर्शन घेऊन गावाकडे परतत असताना अपघात होऊन 14 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. स्थानिकांनी तातडीने मदत कार्याला सुरुवात केली. तसेच पोलीस आणि इतर सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले. विविध लोकप्रतिनिधी घटनास्थळाच्या दिशेला रवाना झाले आहेत. या घटनेमुळे सर्वजण सुन्न झाले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.