Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांनी २०२६ सीबीएसई च्या १०च्या बोर्डाच्या परीक्षेत मिळवले विक्रमी यश

 


परफेक्ट १०० आणि अधिक, फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांनी २०२६ सीबीएसई च्या १०च्या बोर्डाच्या परीक्षेत मिळवले विक्रमी यश

नाशिक - शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या फिजिक्सवाला (पीडब्ल्यू) साठी आजचा दिवस उत्सवी ठरला, कारण तिच्या अनेक विद्यार्थ्यांनी सीबीएसई १० वी बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये उच्च गुण मिळवले, ज्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. अव्वल कामगिरी करणार्‍यांमध्ये पंजाबच्या फजिल्का येथील वैभव अरोरा, गुजरात मधील अहमदाबाद येथील अमोलिक पंडिता आणि ओडिशातील भुवनेश्वर मधील आयुष्यमान मोहापात्रा यांनी १०० टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळवला आहे.

याशिवाय, फिजिक्सवाला चे तंत्रज्ञान-सक्षम ऑफलाइन केंद्र पीडब्ल्यू युनिव्हर्सिटी तर्फे नाशिक येथे सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी शहरातील पीडब्ल्यू विद्यार्थ्यांना, ज्यांनी सीबीएसई इयत्ता १०वी बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली, त्यांचा सत्कार करण्यात आला. उच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अबीर गोविंद कुलकर्णी (97.40%), सार्थक प्रमोद पाटील (97.20%) आणि सौम्या पंकज आहेर (97%) यांचा समावेश होता.

त्यांचा अनुभव सांगतांना वैभव अरोरा म्हणतो , “सातत्यपूर्ण तयारी, नियमित सराव आणि शाळा व पीडब्ल्यू शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे मला उत्तम गुण मिळवण्याचे लक्ष्य ठेऊन ते साध्य करता आले.” अमोलिक पंडिता म्हणते, “नियमित अभ्यास आणि नमुना प्रश्नपत्रिका सोडवणे यांमुळे मला १०० टक्के गुण मिळवण्यात महत्त्वाची मदत झाली. ” आयुष्मान मोहापात्रा ने पुढे सांगितले, “शिस्तबद्ध राहणे आणि रचनात्मक अभ्यास योजनेचे पालन करणे यामुळे त्याला पूर्ण गुण मिळवणे शक्य झाले.”

निकालांवर भाष्य करताना, फिजिक्सवाला चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अलख पांड्ये म्हणाले, “परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्या समर्पण व कठोर परिश्रमाचे आम्ही कौतुक करतो. विशेषतः ज्यांनी सर्वाधिक गुण मिळवले त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. हे निकाल सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य शैक्षणिक सहाय्य प्रणालीचे प्रतिबिंब आहेत.”

या वर्षी, सीबीएसई इयत्ता १० वी च्या परीक्षांसाठी २५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांच्या कामगिरीतून शैक्षणिक यशामुळे रचनात्मक ऑनलाइन आणि हायब्रिड शिक्षणाच्या वाढत्या भुमिकेला अधोरेखित केले जाते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.