प्रगत हृदयशस्त्रक्रियेत अशोका मेडिकव्हरचे नवे यश: डॉ. प्रणव माळी यांच्या नेतृत्वाखाली 4 बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वी
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये प्रगत हृदयरोग उपचारांच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण यश नोंदवण्यात आले असून, डॉ. प्रणव माळी (CVTS सर्जन) यांच्या नेतृत्वाखाली चार बेंटॉल (Bentall) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत.
या प्रसंगी बोलतांना डॉ. प्रणव माळी म्हणाले की बेंटॉल प्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची व जीव वाचवणारी हृदयशस्त्रक्रिया असून ती एओर्टिक रूट व एओर्टा (महाधमनी) च्या वरच्या भागातील आजारांवर केली जाते. या शस्त्रक्रियेमध्ये खराब झालेला एओर्टिक व्हॉल्व्ह, एओर्टिक रूट व चढती महाधमनी (Ascending Aorta) कॉम्पोझिट ग्राफ्टद्वारे बदलली जाते तसेच कोरोनरी आर्टरीज पुन्हा जोडल्या जातात. ही प्रक्रिया उच्च दर्जाचे शस्त्रकौशल्य, अत्याधुनिक तंत्रज्ञान व अनुभवी वैद्यकीय पथकाची गरज असते .
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या सर्व चार बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्या असून, रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून ते सामान्य जीवन जगत आहेत. हे यश हॉस्पिटलच्या उच्च दर्जाच्या सुविधा व गुंतागुंतीच्या हृदयविकारांवरील प्रभावी उपचार क्षमतेचे प्रतीक आहे.
CVTS सर्जन म्हणून डॉ. प्रणव माळी यांचे कौशल्य, तसेच अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कार्डियाक आयसीयू आणि समर्पित वैद्यकीय पथकाच्या पाठबळामुळे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने गुंतागुंतीच्या हृदयशस्त्रक्रियांमध्ये उत्कृष्टतेचा नवा मानदंड निर्माण केला आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल रुग्णकेंद्रित, दर्जेदार व जागतिक दर्जाच्या हृदय उपचारांसाठी सातत्याने कटिबद्ध आहे.
अशोका मेडिकोव्हर हॉस्पिटलमध्ये, महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत हृदय शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.
या प्रसंगि डॉ. सुधीर शेतकर (वरिष्ठ हृदयरोग तज्ञ), डॉ. सीमा नक्साने (वरिष्ठ हृदयरोग तज्ञ), डॉ. गिरीश बच्छाव (हृदयरोग तज्ञ), डॉ. कांचन भांबरे (हृदयरोग तज्ञ),डॉ शर्वरी माळी आणि केंद्र प्रमुख श्री. अनुप त्रिपाठी हे उपस्थित होते.

