Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच दुसऱ्या पिढीतील प्रगत ‘लीडलेस पेसमेकर – AVIER’ चे प्रत्यारोपण नाशिक येथे


उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच दुसऱ्या पिढीतील प्रगत ‘लीडलेस पेसमेकर – AVIER’ चे प्रत्यारोपण नाशिक येथे

नाशिक, नोव्हेंबर २०२५: नाशिकच्या वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. सीमा अजय नक्षणे (गवळी) यांनी दुसऱ्या पिढीतील अत्याधुनिक लीडलेस पेसमेकर ‘AVIER’ यशस्वीरित्या प्रत्यारोपित केला. ही शस्त्रक्रिया अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथे करण्यात आली. हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले प्रत्यारोपण ठरले असून हृदयरोग उपचारात नाशिक शहरासाठी ही ऐतिहासिक पायरी ठरली आहे.

रुग्ण एक वृद्ध पुरुष असून त्याला नुकताच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे फक्त पंधरा दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यामुळे तो सध्या दोन रक्त पातळ करणाऱ्या औषधांवर (ड्युअल अँटिप्लेटलेट थेरपी) होता. अशातच त्यांचे हृदयाचे ठोके खूप कमी झाल्यामुळे त्यांना परमनंट पेसमेकर बसविण्याची आवश्यकता निर्माण झाली.अशा परिस्थितीत पारंपरिक पेसमेकर बसविताना छातीत पॉकेट तयार करून वायर घालावी लागते, ज्यामुळे गंभीर रक्तस्रावाचा व संसर्गाचा धोका निर्माण होतो. रक्तपातळची औषधे थांबविणेही अशक्य असल्याने पारंपरिक पद्धतीने पेसमेकर बसविणे अत्यंत जोखमीचे ठरले असते.


या गुंतागुंतीच्या परिस्थितीत डॉ. सीमा नक्षणे (गवळी) यांनी लीडलेस तंत्रज्ञानाचा पर्याय निवडला. AVIER लीडलेस पेसमेकर हे सुक्ष्म, वायरविरहित, आणि संपूर्णपणे हृदयाच्या आत बसविले जाणारे उपकरण आहे. ते पायातील शिरेमार्गे कॅथेटरच्या सहाय्याने हृदयात बसविले जाते, त्यामुळे छातीवर कुठलाही चिर नाही किंवा बाह्य तारांची गरज नसते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव, संसर्ग आणि इतर गुंतागुंतींचा धोका जवळपास शून्य होतो. रुग्णाने अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला असून अल्पावधीतच तो बरा होऊन घरी परतला.

लीडलेस पेसमेकर हे हृदयाच्या ठोक्यांचे नियंत्रण करण्यासाठीचे अत्याधुनिक आणि सुरक्षित तंत्रज्ञान आहे. विशेषतः वृद्ध रुग्ण, रक्त पातळ करणारी औषधे घेणारे किंवा संसर्गाचा धोका असलेले रुग्ण यांच्यासाठी ही उपचारपद्धती अत्यंत उपयुक्त आहे.

या प्रासंगी डॉ.कांचन भांबरे, डॉ.गिरीश बच्छाव, श्री अनुप त्रिपाठी आणि श्री शिवकुमार रोहाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले

डॉ. सीमा अजय नक्षणे (गवळी) म्हणाल्या, “लीडलेस पेसमेकर हे हृदयरुग्णांसाठी एक क्रांतिकारी पर्याय ठरत आहेत. पारंपरिक पेसमेकरच्या तुलनेत ही प्रक्रिया अधिक सुरक्षित, वेदनारहित आणि लवकर पुनर्वसन करणारी आहे. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना आता जागतिक दर्जाचे हृदय उपचार 

नाशिक मधील नामवंत अशोका मेडिकल हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.