Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

प्रेडर–विली सिंड्रोम असलेल्या ११ वर्षांच्या ९५ किलो वजनाच्या मुलावर अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी लेप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी

नाशिक : प्रेडर–विली सिंड्रोम (Prader–Willi Syndrome) या दुर्मिळ जनुकीय विकारामुळे असह्य भूक, सतत खाणे आणि झपाट्याने वाढणारे वजन यामुळे त्रस्त असलेल्या ११ वर्षांच्या ९५ किलो वजनाच्या मुलावर अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे वरिष्ठ बॅरियाट्रिक सर्जन डॉ. संदीप सबनीस यांनी लेप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

या मुलाला अतिवजनामुळे झोपेत श्वासोच्छ्वासाचा त्रास (स्लीप ॲप्निया), हालचालींमध्ये अडचण, तसेच भविष्यात डायबेटिस आणि हायपरटेन्शनचा गंभीर धोका निर्माण झाला होता. पारंपरिक आहार-नियंत्रण पद्धतींनी परिणाम दिसत नसल्याने तज्ज्ञांच्या बहुवैद्यकीय समितीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.

सखोल मूल्यमापनानंतर ही शस्त्रक्रिया डॉ. संदीप सबनीस व पेडियाट्रिक एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉ. तुषार गोडबोले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मुख्य अॅनेस्थेशिया डॉ. संदीप भंगाळॆ आणि सर्जन डॉ. प्रखर गुप्ता यांनीही या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.

ही शस्त्रक्रिया अतिशय लहान चिरांद्वारे लेप्रोस्कोपिक पद्धतीने करण्यात आली असून मुलाची प्रकृती सध्या उत्तम आहे. तो एक–दोन दिवसांत घरी जाण्याच्या स्थितीत आहे.

डॉ. संदीप सबनीस म्हणाले, “प्रेडर–विली सिंड्रोममध्ये मुलांची भूक नियंत्रणात ठेवणे जवळजवळ अशक्य होते. त्यामुळे अल्पवयातच अतिलठ्ठपणा जीवघेणा होऊ शकतो. अशा निवडक रुग्णांमध्ये स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी हा सुरक्षित आणि जीवनरक्षक पर्याय ठरतो.”

याप्रसंगी डॉ. तुषार गोडबोले, डॉ. प्रखर गुप्ता, डॉ. संदीप भंगाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

या यशस्वी शस्त्रक्रियेने अशोका मेडिकव्हर रुग्णालयाने प्रगत बॅरियाट्रिक व मेटाबॉलिक केअरमध्ये आपले नेतृत्व अधिक दृढ केले आहे. विशेषत: प्रेडर–विलीसारख्या गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये अत्याधुनिक उपचार देण्याची क्षमता नाशिकमध्ये उपलब्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

अशोका मेडिकोव्हर हॉस्पिटलचे मार्केटिंग प्रमुख श्री. शिवकुमार रोहाडे यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.