नुकत्याच संपन्न झालेल्या दैनिक पुढारी आयोजित सरपंच सन्मान सोहळा या कार्यक्रमात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा.छगन भुजबळ यांचे हस्ते विंचूर चे सरपंच सचिन दरेकर यांचा सत्कार करण्यात आला.
विंचूरचे विकास पुरूष सरपंच सचिनजी रत्नाकर दरेकर
विंचूरचे सरपंच सचिनजी रत्नाकर दरेकर हे असे नाव ज्यांच्या कार्यकाळात व नेतृत्वात माझी वसुंधरा अभियानातंर्गत विंचूर ग्रामपालिकेला राज्यात तिस-य़ा क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ते विंचूरचे युवा तथा तडफदार नेतृत्व सचिनजी दरेकर यांच्यासाठी त्यांनी आतापर्यत केलेल्या कामाची ही पावतीच म्हणावी लागेल. व त्यासाठीच प्रारंभी या पुरस्काराचा उल्लेख करणे संयुक्तिक ठरते. कारण त्यांनी याच पुरस्काराच्या माध्यमातून विंचूर ग्रामपालिकेस राज्यपातळीवर गौरव प्राप्त करून दिले. आतापर्तचे सर्वात तरूण सरपंच लाभलेले सचिन दरेकर यांना शेतीबरोबर राजकारणाची आवड असल्याने अगदी कमी वयात साधारण तीसी मध्ये विंचूर गावचे सरपंच झाले. तशी त्यांच्या घरात आई सरपंच याचा अपवाद वघळता कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना ते या पदापर्यंत येऊन पोहोचले. तसे त्यांच्या आई कै.सौ. शकुंतला दरेकर यांना विंचूरचे सरपंच करण्यासाठीचा पुढाकार तथा प्रयत्न सचिन यांचाच होता. सचिन यांच्या मातोश्री कै.सौ. शकुंतला दरेकर या २०१५ मध्ये विंचूर गावच्या सरपंचदी विराजमान होत्या.
कै. शकुंतला दरेकर सरपंच असताना त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. त्यांच्या कार्यकाळात विंचूरला तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती त्यावेळेस पाण्याचे टँकर लावून गावाला स्वखर्चाने तसेच ग्रामपालिकेमार्फत पाणी पुरविले होते. मात्र दि. 1 जून 2018 रोजी त्यांचे अपघाती निधन झाले व तरूण वयातच सचिन यांचे मातृछत्र हरपले. सचिनजी राजकारणात येण्यापूर्वी शिवसेनेचे भगवे वादळ या नावाने त्यांनी युवकांसाठी मोठा ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपच्या माध्यमातून विंचूर गावात रक्तदान शिबिर या सारखी उपक्रमे राबविली. पण सचिनजींची स्वप्ने व ध्येय मोठी होती आणि अशा वेळेस शिवसेनेत (सध्याचा ठाकरे गट) राहून समाजकार्य करण्यासाठी मर्यादा येत होत्या. याचा सारासार विचार करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळेस त्यांनी राष्ट्रवादीकडून निफाड पंचायत समितीसाठी निवडणूक देखील लढवली मात्र यात त्यांना यश लाभले नाही. सरपंच झाल्यानंतर आईची उर्वरित राहिलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सचिन हे अविरतपणे प्रयत्नशिल आहेत. सचिनजी हे सरपंच पदाबरोबरच सध्या राष्ट्रवादी काँग्रसचे निफाड तालुका पूर्व विभागाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. स्वाभाविकपणे ही सर्व विकास कामे करीत असतांना त्यांना मतदार संघाचे आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांची मोलाची साथ व मार्गदर्शन लाभले व त्यामुळेच त्यांना मोठ्या प्रमाणात विकास कामे करता आली. ही सर्व विकासकामे करीत असतांना ग्रामपालिकेला कधीही निधीची कमतरता भासली नाही. माननीय आमदार छगनरावजी भुजबळ यांच्या कायम संपर्कात राहून सरकारच्या जवळपास सर्व योजना त्यात प्रामुख्याने विंचूरसह सोळा गाव पाणी योजनेची पाईपलाईन दुरूस्ती, दशक्रिया विधी शेड, अभ्यासिका, सर्व समाजांकरता सभामंडपे, विंचूर चौफुलीवरील सकर्ल व सुशोभीकरण, गावात सौर ऊर्जा लाईट बसवणे, गावातील पाईपलाईन दुरूस्ती, शौचालये, जिल्हा परिषद शाळा शौचालय, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, विंचूर गावा लगतचे रस्ते (मरळगोई रोड, थेटाळा रोड, सुभाष नगर रोड, डोंगरगाव रोड, जुना गोंदेगाव रोड, प्रताप सागर कडे जाणारा रोड इ.) तसेच गावातील भुमिगत गटारी यासाठी सहा कोटी रूपयांचा निधी अशा अनके विकासकामांसाठी पाठपुरावा करून व भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून विकास निधी मंजूर करून ती कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्नशिल आहे. सरपंच पदाची जाबाबदारी पार पाडीत असतांनाच सचिनजी गावातील प्रत्येकाच्या अडीअडचणीच्या काळातही मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. ही सर्व समाजकामे करीत असतांना वडील रत्नाकर दरेकर व भाऊ ज्ञानेश्वर व शैलेश यांची कौटुंबीक पातळीवर मोठी साथ लाभल्याने त्याप्रमाणे आपले सहकारी उपसरपंच श्री. प्रविण चव्हाण व ग्रामविकास अधिकारी श्री.जी.टी खैरनार यांची मोलाची साथ लाभल्यानेच ही विकास कामे आपण करू शकलो असे सचिनजी यांनी आवर्जून सांगितले. असे विकासाची स्वप्ने बाळगून व ती पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे युवा सरपंच विंचूरला लाभले ही बाब विंचूरकरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

