नाशिक जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी विंचूरयेथील लोणगंगा नदीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जि.प.च्या कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे, निफाड पं.स.चे गटविकास अधिकारी महेश पाटील, शाखा अभियंता अशोक बिन्नर, शाखा अभियंता गायकवाड, प्रभाकर कराळे, विशाल पाटील हे होते.
शासनाच्या वतीने सुरु असलेल्या राज्य नदी संवर्धन अभियानांतर्गत विंचूर येथील लोणगंगा नदीच्या अशुद्ध पाण्यावर १.५(दिड) एम.एल.टी क्षमतेचा एस.टी. पी. टॅंक उभारुन सांड पाण्याचे शुद्धीकरण करणे.तसेच लोणगंगा नदीचे सुशोभिकरण करणे आदी १४.२९ लक्ष रुपयांच्या कामाचा समावेश आहे.
सदर कामाची माहिती घेण्यासाठी मित्तल यांनी येथील लोणगंगा नदीची पाहणी केली.यावेळी विंचूर ग्रामपालिकेचे सरपंच सचिन दरेकर, उपसरपंच प्रविण चव्हाण, ग्रामविकास अधिकारी ग्यानदेव खैरनार, पांडूरंग राऊत, विलास गोरे, ग्रामपालिका सदस्य दिलीप चव्हाण, दत्तात्रय व्यवहारे, इम्रान मोमीन,सागर बोराडे, निफाड पं.स.च्या महिला व बालकल्याण विभागाच्या पर्यवेक्षिका वंदना खांदवे, तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.

