Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच संस्थेची वाटचाल सुरु - चेअरमन रामराव बनकर

 

शरद लोहकरे, लासलगाव ....

निफाड तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची आर्थिकवाहिनी असलेल्या निफाड तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन रामराव बनकर  यांचा अध्यक्षतेखाली नक्षत्र मंगल कार्यालयात येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी बनकर यांनी सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच संस्थेची वाटचाल सुरु आहे असे प्रास्तविकातून व्यक्त केले,

यावेळी व्यासपीठावर संस्थापक व शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे,संस्थापक अध्यक्ष कैलास भारती, चेअरमन रामराव बनकर, व्हा चेअरमन सोनाली होळकर, कार्यवाह बाळासाहेब गुंजाळ,माजी जि. प.सदस्य भास्करराव भगरे,संचालक नगरसेवक साहेबराव बर्डे,बाळासाहेब सोनवणे,गणेश महाले,श्री माणकेश्वर वाचनालायचे सहचिटणीस तथा संचालक राहुल दवते,किरण जाधव,भगीरथ सोनवणे,बाळकृष्ण वाजे,संचालिका हेमलता जाधव,स्वीकृत संचालिक हेमंत खैरनार,विलास दखणे आदींसह एन डि एस टी चे संचालक समीर जाधव, निफाड आश्रमशाळेचे मुख्याध्यापक नितीन कडलग,वैनतेय चे मुख्याध्यापक एम एस माळी, प्रभाकर सांबरे ,शारदादेवी पतसंस्थेचे संचालक सतीश पवार आदी व्यासपीठावर होते.

याप्रसंगी सुभाष खाटेकर, दिलीप कुंभारडे,मनोज सूर्यवंशी, कृष्णराज बनकर आदी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नाचे निरसन चेअरमन बनकर यांनी केले,

यावेळी सभासद संतोष बिऱ्हाडे,शालिग्राम बोरसे,नरेश चौरे,गणेश मेधने, संदीप अहिरे,करिम तांबोळी, प्रवीण शिंदे,संदीप चकोर, सुनील होळकर ,कृष्णराज बनकर,रशीद पठाण,वैभव कर्डीले,जालिंदर कडाळे,गोरख सानप,मिलिंद चव्हाण, श्रीहरी शिंदे, मोहन निकम, अशोक मोरे , सुहास पाटील , माधव पवार , अनिल कुंभार्डे, किशोर धामोरे, महेंद्र गायकवाड,विनोद परदेशी, नितीन डोखळे आदींसह व्यवस्थापक रतन दिवटे, ज्ञानेश्वर धाटबळे आदी मान्यवर उपस्थित होते,

सभेमध्ये संस्थेला सन 2022-23 वर्षी 65 लाख 95 हजार नफा,ठेवी 14 कोटी 34 लाख,भागभांडवल 7 कोटी 46 लाख,कर्जवाटप 22 कोटी 71 लाख,तर सभासद 480 असून सभासदांना 7.25% लाभांश वाटप करणार असल्याचे चेअरमन रामराव बनकर यांनी सांगितले.याप्रसंगी आर्थिक पत्रके,नफा वाटणी,पुढील वर्षाचे अंदाज पत्रक,लेखापरीक्षकांची नियुक्ती आदी विषय सर्वानुमते मंजुर करण्यात आले,सभेचे प्रास्तविक चेअरमन रामराव बनकर, अहवालवाचन कार्यवाह बाळासाहेब गुंजाळ,सूत्रसंचालन संतोष बिऱ्हाडे,तर आभार गणेश महाले  यांनी मानले,

-----------------------------------

नूतन सभागृहाचे नामकरण निश्चित---

संस्थेच्या नूतन सभागृहाचे नामकरण शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिलेले "शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे सभागृह"असे करावे असा ठराव जि. प.सदस्य तथा संचालक भास्करराव भगरे यांनी मांडला.यास अनुमोदन नगरसेवक तथा संचालक साहेबराव बर्डे यांनी दिल्यावर ठराव सर्वानुमते टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.