भालूर/प्रतिनिधी -
शेतकरी म्हटला की, त्याचे जीवन हे फक्त आशेवर अवलंबून असते. पेरणीपासून ते बाजारपेठेपर्यंत त्याला फक्त आशेवर जगावे लागते. उन्हाळ्याच्या रखरखीत झळा सोसून जून मध्ये पावसाळ्याची वाट बघत बसलेल्या बळीराजाला ऑगस्ट महिना सुरु होऊनही पावसाने गुंगारा दिल्याने आज रोजी त्याला अनेक संकटाना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. आज येईल ,उद्या येईल या आशेवर दोन महिने उलटूनही पावसाने पाठ फिरवल्याने पिकांना, गुरांना आणि माणसांना हि आता पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. पाऊस येईल या आशेवर अनेक शेतकर्यांनी टोमॅटोची लागवड केली रोपे लहान असताना कमी पाण्यावर त्यांची तहान भागात होती. मात्र झाडांची वाढ आणि तहानही वाढू लागली तशी विहिरीतील पाण्यानेही तळ गाठायला सुरुवात झाली. परिणामीउपलब्ध पाणी आणि झाडांना असलेली पाण्याची गरज याचा ताळमेळ बसेना. इकडे बाजारात टोमॅटोचेभाव गगनाला भिडलेलेअसताना हातात आलेले पिक सोडता येईना अशा विवंचनेत अनेक शेतकर्यांनीटँकरच्या पाण्याचा आधार घेत झाडे जिवंत कशी ठेवता येईल यासाठी प्रयत्न चालविला आहे. बाजारपेठेत असलेलाभाव आणि त्या आशेवर एकाटँकरला 1200 रुपये मोजूनटोमॅटोचे पिक जागविण्याचा प्रयत्न लक्ष्मीनगर येथील शेतकरी पुंजाराम उगले यांनी चालविला आहे. भालूर, लक्ष्मिनगर, लोहशिंगवे,मोहेगावपरिसरात शेतकर्यांनी पावसाच्या आशेवर लाल कांद्याची रोपे टाकली असून त्यानाही पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे. शेतकर्यांनीजवळ असलेला पैसा बियाणे, औषधे,आणि शेती मशागतीसाठी खर्च केला असून आता तो वाया जाण्याची भीती शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
छातीवर दगड ठेऊन आज पर्यंत चार किमीवरून टँकरच्या पाण्यावर आठवड्यातून दोनदाटोमॅटोचेला पाणी देण्यासाठी अंदाजे दहा हजारापर्यंत खर्च येत आहे. आज रोजीटोमॅटोलाअसलेले भाव बघून तोंडाशी आलेला घास सोडता येईना त्यामुळे छातीवर दगड ठेऊन का होईन जोपर्यंत पाणी मिळत आहे तोपर्यंतटोमॅटो जगविण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. कारण आता आम्हाला दुसरे उत्पन्नाचे साधन नाही कांद्याला मिळत असलेला कमीकमी दर आणि कांद्याचे चाळीतच खराब होण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे आमच्यासमोर आर्थिक संकट आ वासून उभे राहिले आहे तरीपण मी हार मानणार नाही.
- पुंजाराम उगले, शेतकरी लक्ष्मीनगर.

