*नाशिक/प्रतिनिधी:-*
येथील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोधले नगर येथे असलेल्या चंद्रमा टिंबर मार्ट समोर पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीवरून आलेल्या अज्ञात तीन संशयतांनी दुचाकीवरून जाणाऱ्या युवकाचा पाठलाग करत त्याला दुचाकीला लाथ मारत खाली पाडले व काही कळायच्या आत दोघांवर धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला यात तुषार एकनाथ चावरे वय १८ हा तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेला मित्र पळून गेल्याने त्याचा जीव वाचला. भर रस्त्यात संध्याकाळी आठ वाजे दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांनी अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना संशयीतांबाबत लवकरात लवकर माहिती मिळवावी व त्यांना अटक करावी अशा सूचना केल्या यावरून गुन्हे शोध पथकाचे विनोद लखन व जयंत शिंदे यांना आरोपीं बाबत गोपनीय माहिती मिळाल्यावर त्यांनी तीन संशयतांना ताब्यात घेतले असून त्यांनी पूर्व वैमान्यातून हा गुन्हा केल्याचे कबूल केले, गांगुर्डे चौक पंचशील नगर येथे राहणारे संशयित सुलतान मुक्तार शेख वय 21 वर्ष, रोहित मनोहर पगारे वय १८ वर्ष व एक विधी संघर्षित संशयतास ताब्यात घेत खुनाच्या गुन्ह्यातील संशयतास ताब्यात घेण्यात उपनगर पोलिसांना यश आले आहे, उपनगर पोलीस ठाण्यातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांना कठोर पावलं उचलावी लागणार असल्याचे मत सर्वसामान्यांनी व्यक्त केले आहे.
तिघा संशयतांना अटक करण्यासाठी उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी, महाजन, विनोद लखन, जयंत शिंदे, सोमनाथ गुंड, अनिल शिंदे, राहुल जगताप, सुरज गवळी, गौरव गवळी, पंकज करपे, सौरभ लोंढे यांनी अथक परिश्रम घेत संशयतांना ताब्यात घेतले.

.jpeg)