प्रत्येक तालुक्याला आपल्या सारखा आमदार लाभावा
- अपघातग्रस्त भाविकांची कृतज्ञता
इगतपुरी ( प्रतिनिधी )
अनेक व्यक्ती स्वार्थासाठी काम करताना दिसतात. मदत करण्याचे काम सहजासजी कुठेही होताना दिसत नाही. मात्र आरोग्यदूत म्हणून परिचित असलेले इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या मदतीने कोपरगाव तालुक्यातील अपघातग्रस्त भाविकांना तात्काळ उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला आहे. त्याच्या नातेवाईकांनी कृतज्ञता व्यक्त करीत आ. खोसकर यांचे आभार मानले. आमदार हिरामण खोसकर त्रंबकेश्वर येथील आयोजित कार्यक्रमाला जात असतांना खंबाळे येथे रस्त्यांचे खड्ड्यांमुळे अपघात झाला. त्यांनी आपले नियोजित काम रद्द करून पावसाची पर्वा न करता तात्काळ अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करीत त्रंबकेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी केले दाखल त्यानंतर प्राथमीक उपचारानंतर पुढिल उपचारासाठी नासिक येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनास्थळी रुग्णवाहिका नसल्याने ऐका खाजगी वाहनामध्ये नेऊन तात्काळ व वेळीच उपचार केल्याने अपघात ग्रस्तांनी आमदार हिरामण खोसकर यांचे आभार मानीत प्रत्येक तालुक्याला आपल्या सारखा आमदार लाभावा अशी प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केले.यावेळी आमदारांसमवेत माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक माळेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश कोठुळे , सामाजिक कार्यकर्ते हरिष गायकवाड आदिंनी मदतकार्य केले.
२ महिन्यांपूर्वीचं झालेल्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात होत असल्याने आमदार खोसकर संतप्त झाले असून, सदर खड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांची तारंबळ होत आहे. अपघात व वाहतुकीची कोंडी होत आहे .निक्रुष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी आमदारांनी केली असुन अपघातांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांना जबाबदार धरुन अपघातात काही जीवितहानी झाल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुण्हा दाखल करावा अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार हिरामण खोसकर यांनी दिली.

