Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

मुंबईच्या ओम श्री साई सेवक मंडळाच्या साई पालखीचे इगतपुरीत जोरदार स्वागत

 लक्ष्मण सोनवणे, इगतपुरी


मुंबई ते शिर्डी 250 किलोमीटरचा प्रवास करीत साईनाथ महाराज की जय" चा जयघोष करीत मुंबई येथून निघालेली साई भक्तांची पदयात्रेचे इगतपूरी येथील शिवाजी नगर येथे श्वेता ताई पवार यांच्या निवास्थानी जोरदार स्वागत करण्यात आले. 30 वर्षांपासून मुंबई येथील ओम श्री साई सेवक मंडळाच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त दरवर्षी शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. रामनवमी महोत्सवाच्या दिवशी साईबाबांच्या चरणी सेवा अर्पण करत तेथे ही पालखी पोहोचते. 250 किलोमीटरचा प्रवास चार ते पाच दिवसात पूर्ण पायी करत साईनामाचा जय घोष केला जातो. अतिशय शिस्तबद्ध असलेल्या हजारो पालख्या व लाखो साई भक्त रस्त्याने जाताना भक्तिमय वातावरण तयार करतात इगतपूरीच्या शिवाजीनगर भागातील नागरीकांनी साई पालखीचे स्वागत केले. साईबाबांची मूर्ती अन चांदीची पादुका यांचा दूध व तुपाचा अभिषेक करून रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावेळी प्रभूनयन फाऊंडेशन व श्री साई सहाय समितीच्या वतीने साई भक्तांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात त्यांची तपासणी करण्यात आली. व औषध उपचार करण्यात आले. याप्रसंगी प्रभू नयन फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मवाणी, दीपा मवानी, डॉ मनोहर पाटील, डॉ संगीता पाटील, डॉ जानवी यादव, श्री साई साहाय समितीचे अध्यक्ष राजू देवळेकर, श्वेता यादव, अनुजा यादव, रश्मी यादव ,वर्षा यादव ,स्वप्नाली मस्के, सागर जाधव, सुमित बोधक ,प्रमोद डेंगळे ,चैतन्य अहिरे ,गौरेश राऊत ,कार्तिक यादव, गौतमी राऊत, गीता राऊत आदी उपस्थित होते


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.