रामभाऊ आवारे, निफाड प्रतिनिधी
आजपर्यंतच्या इतिहासात महिलांनी अनेक विक्रम व कार्य केले असून आज खऱ्या अर्थाने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज समाजात महिलाही अग्रेसर झाल्या असून मेहनत, जिद्द, चिकाटी व साहस या गुणांचा अवलंब करत आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहे. तालुक्यातील एका गरोदर महिला वैद्यकीय अधिकारी यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उचललेली पावली निश्चितच भूषणावह असून महिलांना अभिमान वाटावा असे केलेले कार्य निश्चित आदर्शवत होईल यात तिळमात्र शंका नाही.
"झाले बहु होतील बहु परंतु या सम हा" या उक्तीप्रमाणे निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील गरोदर वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियंका पवार यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एका विष प्राशन केलेल्या रुग्णाचे प्राण वाचवल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव सुरू आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळसाकोरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियंका पवार ह्या स्वतः गरोदर असताना वेळेची गरज ओळखून एक तातडीच्या रुग्णालयाचे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर रजेवर असल्याने स्वतः प्राथमिक आरोग्यकेंद्राची ॲम्ब्युलन्स चालवत विष प्राशन केलेल्या रुग्णाला निफाड येथे ग्रामीण रुग्णालयात घेवून गेल्या आणि उपचार सुरू केले.मांजरगाव येथील 22 वर्षीय तरुणाने विष प्राशन केले त्याचेवर तातडीने उपचाराची गरज होती. प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळसाकोरे येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्या रुग्णाला तातडीने पुढील संदर्भ सेवेची आवश्यकता होती मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळसाकोरे येथील वाहनचालक रजेवर असल्याने परिस्थितीचे एकंदरीत गांभीर्य लक्षात घेऊन व रुग्ण वाचला पाहिजे या आरोग्य विभागाच्या नियमांसी बांधली गेलेल्या एक वैद्यकीय अधिकारी स्त्री त्यातही गरोदर असूनही स्वतःचा विचार न करता आरोग्य सेवक श्री संसारे यांना सोबत घेवून स्वतः गाडी चालवत ग्रामीण रुग्णालय निफाड येथे तातडीने रुग्णाला पोहचवून वेळेत पुढील उपचार सुरू झाला. रुग्णाचे प्राण वाचल्याबद्दल व गरोदर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियंका पवार यांनी आपल्या जीवाचा विचार न करता गरोदरपणातही निफाड प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाला उपचारासाठी आणल्याबद्दल व त्या रुग्णाचा जीव वाचवल्याबद्दल सर्व कर्मचारी वर्गाकडून वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियंका पवार मॅडम यांचे कौतुक करण्यात येत आहे.

