पिंपळगाव बसवंत शहर पत्रकार संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन
February 02, 2023
0
दिक्षी - नाशिक जिल्ह्यात प्रथमच पिंपळगाव येथील पत्रकार संघासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पत्रकार कार्यालय सुरू झाले असून या कार्यालयाचे उद्घाटन सरपंच भास्करराव बनकर व आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने समाजातील विविध प्रश्न आपल्या लेखणीतून प्रशासनापर्यंत पोहचविण्याचे कार्य पत्रकार करत असल्याने या पत्रकारांना हक्काचे कार्यालय मिळावे यासाठी सरपंच भास्करराव बनकर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक कार्यालय उपलब्ध करून देत त्याचे उद्घाटन आमदार दिलीप बनकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी नाशिक जिल्हा पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे, मंडळ अधिकारी नीलकंठ उगले, पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम, तलाठी अभिजित पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनायक खोडे, स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ माळोदे, सहाय्यक निरीक्षक कुणाल सपकाळे, सुरेश खोडे, नितीन बनकर, संजय हंडोरे, चंद्रकांत विधाते, सतीश मोरे, मुखेड सरपंच अमोल जाधव, . पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सोमनाथ चौधरी, पिंपळगाव शहर अध्यक्ष गिरीश बिडवई, कवी लक्ष्मण महाडिक, दीपक आहिरे, हेमंत थेटे, राजेंद्र पवार, राकेश बनकर . गणेश शेवरे,सोमेश्वर मोरे सुरेश गांगुर्डे, पोलीस कर्मचारी मिथुन घोडके, रत्नाकर कदम आदींसह विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

