श्री अन्नपूर्णा प्रसादालाय सुविधेला अन्न व औषध प्रशासनाने केले भोग प्रमाणपत्र प्रदान
February 03, 2023
0
सोमनाथ मानकर सप्तशृंगी गड
श्री अन्नपूर्णा प्रसादालाय सुविधेला अन्न व औषध प्रशासनाने केले भोग प्रमाणपत्र प्रदान.
साडेतीन शक्तीपीठ पैकी आद्यपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेने भाविकांसाठी कार्यान्वित केलेल्या श्री अन्नपूर्णा महाप्रसाद प्रक्रियेला केंद्र शासन व राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने उत्तर महाराष्ट्रातील भोग प्रमाणपत्र विश्वस्त संस्थेला यापूर्वी जाहीर केले होते. त्याचे प्रमाणपत्राचे अधिकृत वितरण आज शुक्रवार, दि. ०३/०२/२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे मा जिल्हाधिकारी श्री गंगाथरण डी यांच्या शुभहस्ते व अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांचे मा विभागीय आयुक्त श्री विवेक पाटील, मा सहा विभागीय आयुक्त श्री महेश सानप, मा सहा आयुक्त श्री संदिप देवरे आदी उपस्थित विश्वस्त संस्थेच्या पदाधिकारी यांकडे सन्मानपूर्वक करण्यात आले. प्रसंगी विश्वस्त संस्थेचे विश्वस्त मा ऍड श्री ललित निकम, मा सौ मनज्योत पाटील, मा. श्री भूषणराज तळेकर, विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री भगवान नेरकर, इस्टेट कस्टोडियन श्री प्रकाश पगार तसेच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
विश्वस्त संस्थेच्या वतीने भाविकांना विविध प्रसाद व महाप्रसाद सुविधा या श्री अन्नपूर्णा प्रसादालाय सुविधे अंतर्गत उप्पब्ध करण्यात आल्या असून सदरची सेवा व सुविधा केंद्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न स्वच्छता व सुरक्षा मानकांची पूर्तता करीत असून भाविकांना मोठ्या संख्येने व प्रमाणात श्री प्रसाद व महाप्रसाद सुविधा योग्य त्या दर्जासह स्वच्छता व सुरक्षेसह उपलब्ध करून देत असल्याने सदरचे प्रमाणपत्र प्रत्यक्ष मूल्यमापन व तपासणी अहवालाच्या समाधानकारक पुर्ततेनंतर देण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रथम ८ व उत्तर महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकावर (विभागून) सदरचे भोग प्रमाणपत्र देण्यात आले आहे. नाशिक विभागात श्री क्षेत्र सप्तशृंगगड सह श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राच्या प्रसादलायला देखील भोग प्रमाणपत्र द्वारे प्रमाणित करण्यात आले आहे.

