नांदगाव येथे सन्मान विधवेचा सोहळा हळदी कुंकवाचा उपक्रम साजरा
January 27, 2023
0
नांदगाव ता. निफाड येथे सन्मान विधवेचा सोहळा हळदी कुंकवाचा असा उपक्रम महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष मनीषाताई वाघ यांनी आयोजित केलेला होता. मनीषाताई वाघ यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व विधवा महिला भगिनींना हळदी कुंकवाचे वाण देऊन अतिशय उत्तम मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित मान्यवर महिला दक्षता समितीचे अध्यक्ष सौ वेदिकाताई होळकर, राष्ट्रवादी निफाड पूर्वाच्या तालुकाध्यक्ष सुरेखाताई नागरे, डॉ.मनीषा ताई आवारे, वैशालीताई जाधव,राष्ट्रवादी लासलगाव गट अध्यक्ष फरीदाताई काजी मनीषा डावरे, सुनिता ताई,स्वाती दरेकर आदी उपस्थित होत्या.
सन्मान विधवेचा सोहळा हळदी कुंकवाचा या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वेदिकाताई होळकर या होत्या. यावेळी सर्व विधवा महिला भगिनींना मार्गदर्शन करण्यात आले.सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.खूप छान असा आगळा वेगळा कार्यक्रम नांदगाव येथे घेण्यात आला व सर्व विधवा महिला भगिनींसाठी कोणतीही योजना असो पेन्शन योजना असो ती देखील आपल्या साठी राबवली जाईल असे आश्वासन राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी दिले.

