Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

सोशल मीडियाचा कुमारवयीन मुला-मुलींच्या भावनिक विकासावर परिणाम - डॉ. श्रीकांत आवारे

VINCHUR
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर येथे कुमारावस्थेतील मुला-मुलींसाठी समुपदेशनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे होते. सर्वप्रथम मान्यवरांनी कर्मवीर अण्णा व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचा परिचय प्राध्या. एस.डी.शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकातून करून दिला. प्रमुख व्याख्याते व समुपदेशक डॉ. श्रीकांतजी आवारे यांनी कुमार अवस्थेतील मुला-मुलींमध्ये घडून येणारे शारीरिक, मानसिक व भावनिक बदल तसेच या अवस्थेत शरीरात कार्यरत असणारे हार्मोन्स म्हणजे संप्रेरके, आहार, आजार, विशेष करून मुलींमध्ये होणारे किंवा आढळणारे आजार, हे दुर्लक्षित न करता त्याचे योग्य निदान व उपचार करण्यास सांगितले. त्यांनी मुला-मुलींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अतिशय समर्पक भाषेत दिली. सोशल मीडियाने या कुमारावस्थेतील मुला-मुलींच्या शारीरिक, मानसिक, भावनिक बदलांवर केलेल्या विपरीत परिणाम विषयी माहिती देताना त्यावर उपाय म्हणून मुला-मुलींनी विविध छंद जोपासावे, स्वतःला सतत कार्यशील ठेवावे, जेणेकरून ते वाईट मार्गाने मार्गक्रमण करणार नाहीत. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ, विद्यालयाचे उपप्राचार्य आर.व्ही. शिंदे, संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे, पर्यवेक्षक डी. टी. जोरे, के. जी. जोपळे, प्राध्या.एस. एन. शेवाळे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक खैरनार सर, सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी व आठवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी लक्ष्मी मोहिते हिने केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन श्रीम.एम.पी. खताळ यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.