Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

विंचूर महाविद्यालयात एमपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या पल्लवी जाधव हिचा सत्कार

 

विंचूर - कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे  26 नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात साजरा केला गेला. या शुभप्रसंगी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. पल्लवी रमेश जाधव ही एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन सहाय्यक विक्रीकर निरीक्षक व कक्ष अधिकारी झाली. त्यानिमित्त तिचा सत्कार व विद्यार्थ्यांना प्रेरणा म्हणून मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले. 

   कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरती दरेकर या विद्यार्थिनीने अध्यक्ष निवडीची सूचना आणली व त्या सुचनेस वैष्णवी राऊत हिने अनुमोदन दिले. मान्यवरांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाच्या प्रतीचे पूजन केले गेले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. त्यानंतर सत्कारमूर्ती पल्लवी जाधव व तिचे वडील रमेश जाधव यांचे तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक के.जी. जोपळे यांचीही कन्या एमपीएससी परीक्षा पास होऊन सहाय्यक विक्रीकर निरीक्षक व कक्ष अधिकारी झाल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजितजी गुंजाळ व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला गेला. संविधान दिनाचे प्रास्ताविक वैष्णवी जेऊघाले हिने केले तर संस्थेचे लाईफ मेंबर आर. के. चांदे यांनी पल्लवी जाधव ची शाळेतील वाटचाल व विविध उपक्रमात तिने कसे यश मिळविले याची माहिती दिली. तर पल्लवी जाधव ने आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी? येणाऱ्या अडचणी कशा दूर कराव्या ? परीक्षेसाठी कोणता अभ्यासक्रम असतो याचे मार्गदर्शन करताना मोबाईलचा अतिवापर टाळून चिकाटीने  यश मिळवावे असे विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच विद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा देताना तिला गहिवरून आले. महाविद्यालयाचे प्राध्यापक आर. टी. टिळेकर यांनी आपल्या मनोगतात संविधान तयार करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची ओळख करून दिली. आर्टिकल 21 व आर्टिकल 39 अ ची माहिती देत व्यक्ती स्वातंत्र्याची माहिती उपस्थितांना दिली. तनुश्री दरेकर, अनुजा गाडेकर व अभिषेक वाघ या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सुजितजी गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना पल्लवी जाधव कडून प्रेरणा घेत त्या दृष्टीने तयारी करावी व यश संपादन करावे. आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेला सामोरे जा. असा संदेश दिला. 

या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य एन. ई. देवढे, उपप्राचार्य आर. व्ही. शिंदे, पर्यवेक्षक डी. टी. जोरे, एस. एन. शेवाळे, सर्व शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यश आघाव याने मान्यवरांचे आभार  व्यक्त केले. तर तेजस्विनी थोरात हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.