Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

विंचूरला लिकेज पाणीप्रश्नी लोकप्रतिनिधीला ढकललं डबक्यात

 विंचूर डोंगरगाव रस्त्यालगतचे ग्रामस्थ संतप्त, ग्रामसेवकांवर सदस्यांची नाराजी

ग्रामपालिका सदस्य नीरज भट्टड यांना डबक्यात ढकललं

विंचूर,  दि.१४

लिकेज पाईप लाईनच्या पाण्यामुळे व सांडपाण्यामुळे डोंगरगाव रोड व लक्ष्मी मार्केट परिसरातील त्रस्त नागरिक व ग्रामपालिका सदस्य निरज भट्टड यांनी डबक्यातील पाण्यात बसून आंदोलन केले. डोंगरगाव रोड लगतच्या वसाहतींचे सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारीची  सुविधा नाही.तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने  दोन करोड रुपये खर्च करून केलेल्या विंचूर डोंगरगाव रस्त्याच्या नुतनीकरण केले.मात्र या रस्त्याला साईड नाल्याच केलेल्या नाहीत.त्यातच आता लक्ष्मी मार्केट लगत आमदार छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालया  समोर सोळा गाव पाणी योजनेची पाईप लाईन लिकेज झाली.या लिकेज झालेल्या पाईप लाईनचे पाणी वाहून डोंगरगाव रोड वर येते.डोंगरगाव रोड लगतच्या वसाहतींचे सांडपाणी व पावसाळ्यात पावसाचे पाणी याच रस्त्यावर येऊन ठिकठिकाणी डबके साचलेले आहे.परिणामी डोंगरगाव रोडवर ठिकठिकाणी डबके साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे.घाणीच्या साम्राज्याने परिसरातील नागरिक आरोग्य समस्यांनी ग्रस्त झालेले आहेत.नागरिकांनी विंचूर ग्रामपालिका, सोळा गाव पाणी पुरवठा समिती, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी तक्रार केली होती.मात्र आजवर कुणीही याची दखल घेतली नाही.त्यामुळे संतप्त नागरिक व ग्रामपालिका सदस्य निरज भट्टड यांनी पाण्यात बसून आंदोलन केले. यावेळी संतप्त नागरिकांना उत्तर देतांना भट्टड यांनी मी लिकेज काढण्यासाठी ग्रामपालिकेकडे

वेळोवेळी पाठपुरावा केला.परंतु ग्रामविकास अधिकारी पैसे नसल्याचे कारण देतात. ग्रामपालिकेकडे  इतर ठिकाणी खर्च करण्यासाठी पैसे आहेत.मात्र या कामासाठी पैसे नाहीत.जनतेची कामे होत नसतील तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. 

तर विलास गोरे यांनी दोन करोड रुपये खर्च करून करण्यात आलेल्या रस्त्याला साईड नाल्या नसल्याने रस्त्यावर पाणी साचून पुर्ण रस्ता खराब झाला आहे.आम्हीआजवर आठ ते दहा वेळेस

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्र व्यवहार केला.परंतु अधिकारी लक्ष देत नाही अशी तक्रार मांडली. यावेळी सरपंच सचिन दरेकर,  सदस्य निरज भट्टड, विलास गोरे, पांडूरंग राऊत, प्रकाश काकड, डॉ राजेश कांगणे, महेंद्र पुंड, डॉ शरद फड, रमेश ढवण.दिपक राऊत, नितीन बोरसे ग्रामविकास अधिकारी जी. टी.खैरनार आदींसह परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ग्रामपालिकेने आजवर पाच सहा वेळेस सोळा गाव पाणी पुरवठा समिती कडे तक्रार केली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून सोळा गावचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता.त्यामुळे लिकजचे काम रखडले होते.मात्र उद्या सोळा गाव पाणी पुरवठा समितीच्या संमतीने लिकेजचे काम पूर्ण करु - सचिन दरेकर, सरपंच ग्रामपालिका विंचूर

आमदार छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालया समोर लिकेज झालेल्या पाईप लाईन मुळे लक्ष्मी मार्केट परिसरात पाण्याचे डबके साचून डासांचे साम्राज्य पसरले आहे.डासांमुळे येथील व्यावसायिकांना आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.येत्या चार दिवसांत लिकेजचे काम पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करणार - महेंद्र पुंड, माजी ग्रामपालिका सदस्य




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.