Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

अखिल भारतीय शिंपी समाजाकडून 'अग्ग बाई सुनबाई' या मालिकेचा जाहीर निषेध

 *अखिल भारतीय शिंपी समाजाकडून 'अग्ग बाई सुनबाई' या मालिकेचा जाहीर निषेध*


भाऊसाहेब हुजबंद 8999921994

विंचुर (नाशिक):- काल जो प्रकार झाला झी मराठी टीव्ही चॅनल्सवर मालिका अग्गबाई सुनबाई मध्ये जे काही दाखवले ते संपूर्णपणे चुकीचे आहे व समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या त्या निषेधार्थ. विंचूर येथील नामदेव शिंपी समाजाकडून संत नामदेव महाराज मंदिरात समस्त शिंपी समाजाकडून तीव्र निषेध करण्यात आला. सध्या झी टीव्हीवर चालू असलेली अग्गबाई सुनबाई या मालीकेत शिंपी समाजाचे उपजीविकेचे साधन शिवण मशिनला लाथ मारून ती मालिका प्रसिद्ध करून समस्त शिंपी समाजाच्या भावना दुखावल्या आहे.झी टिव्हीवर  शुभदा आयरे व शेखर धवलीकर लिखित तसेच सुनील भोसले निर्मित "अग्ग बाई सुनबाई" या मालिकेतील गुरुवार दिनांक २०/०५/२०२१ रोजी रात्री ८-३० वाजता नियमित पणे प्रसारीत होत असलेल्या एपिसोड पुर्वी मालिकेतील महत्वाची व्यक्ती रेखा साकारत असलेले अभिनेते "अद्वैत दादरकर" यांनी समस्त शिंपी समाजाचे उपजीवीकेचे साधन असलेल्या व पुजनीय असलेल्या शिवणमशीनला लाथ मारून समस्त शिंपी समाजाचा  व आपल्या सर्व्यांचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा घोर अपमान केला आहे व देशातील कोणताही शिंपी बांधव हा अपमान सहन करणार नाही.

   "अग्ग बाई सुनबाई" चे लेखक शुभदा आयरे, शेखर धवलीकर, निर्माता सुनील भोसले,अभिनेता अद्वैत दादरकर आणि दिग्दर्शक व झी टीव्ही यांचा अखिल भारतीय नामदेव  क्षञिय महासंघ जाहीर निषेध करीत आहेत. तसेच "अग्ग बाई सुनबाई" चे लेखक शुभदा आयरे, शेखर धवलीकर, निर्माता सुनील भोसले,अभिनेता अद्वैत दादरकर आणि दिग्दर्शक व झी टीव्हीने समस्त शिंपी समाजाची दुरदर्शनच्या माध्यमातूनच जाहीर माफी मागावी व चित्रीत केलेला प्रसंग त्वरीत गाळण्यात यावा अन्यथा समस्त शिंपी समाजाकडून जिल्हाधिकारी व माहिती प्रसारण यांच्या कडे निवेदन देण्यात आले असून जाहीर आंदोलन छेडले जाईल व त्याची संपूर्ण जबाबदारी ही "अग्ग बाई सुनबाई" चे लेखक शुभदा आयरे, शेखर धवलीकर, निर्माता सुनील भोसले,अभिनेता अद्वैत दादरकर आणि दिग्दर्शक व झी टीव्हीची राहील. अरुण नेवासकर(प्रदेशाध्यक्ष), दत्ता वावधाने (उ.महाराष्ट्र  प्रमुख), प्रविण पवार (जिल्हाप्रमुख) नाशिक मधून तर विंचूर मधून किरण नवले (अध्यक्ष), महाजन सर, बाळकृष्ण कल्याणकर, ज्ञानदेव कल्याणकर, विजय क्षिरसागर, विजय झनकर, अनिल क्षिरसागर, अरुण कल्याणकर, गोविंद कल्याणकर, पांडुरंग मोहाडकर, कैलास कल्याणकर, बाळकृष्ण भांबारे, श्रीकांत बकरे, योगेश खर्डे, गौरव क्षिरसागर, दत्तात्रय कल्याणकर बाळकडू चे पत्रकार सुनील क्षिरसागर, दत्तात्रेय करमासे,संजय बोढाई, योगेश खर्डे, मंगेश करमासे, संतोष कल्याणकर, प्रयाग कल्याणकर समस्त विंचूर शिंपी समाज ‌.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.